पातूर – निशांत गवई
यशची राज्यावर यशस्वी भरारी पातुर: 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनी भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मूर्तिजापूर येथे दिनांक 9 व 10 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत सावित्रीबाई फुले विद्यालय पातूर येथील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी यश देविदास इंगळे यांच्या विज्ञान प्रतिकृतीला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित केली होती त्यामधून माध्यमिक गटामधून यश देविदास इंगळे या विद्यार्थ्यांनी बनवलेली रोड रोलिंग बॅरियर ही नवनिर्मित विज्ञान प्रतिकृती ची निवड प्रथम क्रमांकावर झाल्यामुळे या प्रकृती कृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली.
रोडवर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी व जीवित हानी रोखण्यासाठी ही नवनिर्मिती त्याच्या संकल्पनेतून साकारून त्यांनी ती प्रदर्शनीत मांडली होती अत्यल्प खर्चात तयार केलेली ही प्रतिकृती जिल्हास्तरावर चर्चेचा विषय ठरली या नवनिर्मितीला राज्यवर स्थान मिळाल्यामुळे यश इंगळे व त्याचे मार्गदर्शक डी एल करोडदे यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिताताई पाटेकर यांनी सुद्धा भरभरून कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यशच्या या नवनिर्मितीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यश त्याच्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्षा सपनाताई म्हैसने,सचिव सचिन ढोणे, प्राचार्य जे.डी कंकाळ व आपल्या आई-वडिलांना देतो.