Tuesday, December 24, 2024
Homeराज्यशालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२४-२०२५ | ४९१ पैकी ४१४ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला...

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२४-२०२५ | ४९१ पैकी ४१४ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी समर्थ हायस्कूल रामटेक येथील मिडलस्कूल विभागात शालेय विद्यार्थी मंत्री मंडळाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये 09 विदयार्थी व 09 विद्यार्थिनीनी निवडणुकीत आपला अर्ज विभाग प्रमुख सौ. के. पी. बोरकर यांच्याकडे दाखल केले होते. यामध्ये 03 विदयार्थी व 03 विदयार्थीनीची निवड करून निवडून आलेल्या सहा विद्यार्थांना शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पोषण स्वच्छता व आरोग्य मंत्री व परिपाठ मंत्री असे खाते वाटप करण्यात येणार आहे.

यामध्ये 491 पैकी 414 विद्यार्थ्यांनी मतदान केले. मतदानाची एकूण टक्केवारी 84.31 टक्के अशी होती. मोठी माणसे मतदान कशी करतात? मतमोजणी कशी करतात? एकूण प्रक्रिया कशी असते? शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रत्यक्षात राबविण्याच्या निर्णय घेण्यात आला, त्यात एकूण तीन मतदान केंद्र देण्यात आले होते, यात वर्ग पाच साठी बुथ क्रमांक 01 मध्ये श्री. वांढरे सर व श्री. पी.आर. चकोले सर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

सौ. विद्या किंमतकर मॅडम यांच्या निरीक्षणात मतदान घेण्यात आले. बुथ क्रमांक 02 मध्ये इयत्ता सहावीच्या वर्गाकरिता श्री. डी. एच. सोनकुसरे सर व राठोड सर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. श्री. पी. बी. सावरकर सर यांनी निरीक्षकाची भूमिका बजावली. बुथ क्रमांक 03 मध्ये श्री पंधरे सर श्री. जयतवार सर यांनी मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यामध्ये सौ. एम. आर टाकळे मॅडम यांनी निरीक्षक म्हणून काम सांभाळले. उमेदवारा तसेच मतदारांमध्ये निवडणुकीच्या अत्यंत उत्साह होता.

यामध्ये विभाग प्रमुख सौ. के. पी. बोरकर मॅडम यांनी शालेय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान घेण्यात आले. कुमारी स्नेहा चौधरी यांनी पूर्ण निवडणुकीचे उत्तमरीत्या छायाचित्रण केले. मतमोजणीची संपूर्ण जबाबदारी श्री. जे.डी. तवले सर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शिपाई श्री. बी.सी. मरकाम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदान केंद्राचे व्यवस्थापण सांभाळले अशाप्रकारे श्री. पी.आर. चकोले सर यांच्या कल्पनेतून व श्री. आर. बी. जयतवार सर यांच्या योग्य नियोजनामुळे आजची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: