भातसानगर ( शहापूर ) – प्रफुल्ल शेवाळे
सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याच शिक्षकांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती देण्याचा, आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा उपक्रम पहावयास मिळाला आहे. मुंबईला ला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण आणि याच ठिकाणी वसलेलं प्रकल्प विदयालय… या शाळेची स्थापना १९७८ ला झाली. अनेक विद्यार्थी या शाळेने घडवले..
अनेक आदर्श शिक्षकांचा परिस स्पर्श या शाळेला लाभला.. यातच एक आदर्श शिक्षक संदांनशीव सर या शाळेला लाभले…. या सरांनी अनेक गोर गरीब विदयार्थ्यांना व्यक्तीगत मदत केली… शाळेप्रती आपली बहुमोल शिक्षकी सेवा दिली आणि या शिक्षकानं २०२१ साली या जगाचा कायमचा निरोप घेतला..
अशा आदर्श शिक्षकांच्या स्मृती प्रित्यर्थ याच शाळेतील १९९३-९४ बॅच विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून एकत्र येत एक शिष्यवृती योजना चालू केली.. या व्हाट्सअप समूहातील मित्रांनी दर महिन्यला एक ठराविक रक्कम जमा करत एक सामाजिक बांधिलकी म्हणून सदर शिष्यवृत्ती योजना चालु केली आहे..
शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेले होतकरू ५ विध्यार्थी याचे लाभार्थी होत असतात.. या समूहाने आतापर्यंत कोरोना काळात, तसेच समाजातील विविध गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देऊ केली आहे… या शिष्यवृत्ती देणे करिता समूहातील हरिश्चंद्र अधिकारी… सुनिल दाभाडे, प्रशांत चन्ने, युवराज गोरें, प्रफुल्ल शेवाळे आदी माजी विद्यार्थ्यांनी स्वतः त्या त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिष्यवृत्ती व प्रशस्तीपत्रक बहाल केले.
सदर लाभार्थी विद्यार्थी वर्गाच्या पालकांच्या चेहऱ्यावर स्व. संदांनशीव सर यांच्या प्रती असणारी आदरयुक्त भावना आणि माजी विद्यार्थी बद्दल चे अनोखे कौतुक दिसून येत होते…
सामाजिक बांधिलकी जोपासत आम्ही येणाऱ्या आगामी काळात छोटे मोठे उपक्रम राबवत राहणार आहोत यात बिलकुल खंड पडणार नाही… आमच्या ९३-९४ बॅच च्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांचा विश्वास यामुळे असे उपक्रम नक्कीच भविष्यात आणखीन मोठया प्रमाणात उदयास येतील असे प्रशांत चन्ने,सुनील दाभाडे यांनी म्हटलं आहे.
आपल्या पुढील पिढीच्या विद्यार्थी वर्गाने गुरुजनांचा आदर्श वारसा जपत भविष्यात मार्गक्रमण करत राहण्याचा सल्ला… हरिश्चंद्र अधिकारी सर यांनी लाभार्थी विद्यार्थ्यांना दिला आहे..
प्रकल्प विद्यालयातील मुख्यध्यापक शिवाजी पाटील सर आणि विद्यमान शिक्षक वर्गाने आपल्या माजी विद्यार्थ्यांना एक कौतुकाची थाप या निमित्ताने देऊ केली आहे..