नांदेड – महेंद्र गायकवाड
भाग्यनगर पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या गोपाळ कृष्ण नगर अंबिका मंगल कार्यालगत असलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या एस.बी.आय.योनो या नेट बँकिंग लिंकवरून तब्ब्बल पाच वेळा वेगवेगळ्या रक्कमा काढण्यात आले असल्या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 9 जानेवारी रोजी चे 19.30 वा. चे सुमारास विनायक फुटाणे यांच्या राहाते घरी मोबाईल क्रं 9404630527 वर योनो नेट बँकींगची लींकवर युजर आयडी, कृष्णनगर अंबिका पासवर्ड, मोबाईल, क्रमांक, एटीएम क्रमाक ईत्यादी अशी सविस्तर माहीती दिल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाडी बु. छत्रपती चौक नांदेड येथील फुटाणे यांच्या बचत खात्यामधुन एका पाठोपाठ असे पाच वेळेस 1)1,50,000/- रूपये, 2)99,999/-रूपये. 3)24,999/-रू, 4)2.14,780, 5)99,999/- रू असे एकुण रक्कम 5,89777/- रूपये इतक्या खात्यातून रक्कम काढुन फिर्यादीची ऑनलाईन आर्थीक फसवणुक केली. वगैरे फिर्यादी विनायक गोपाळराव फुटाणे, वय 58 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त रा. गोपाळकृष्ण नगर अंबिका मंगल कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भाग्यनगर गुरन 11/2023 कलम 420, भादवि 66(डी) आयटी अॅक्ट कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तपास पोलीस निरीक्षक श्री आडे हे पुढील तपास करीत आहेत.