Tuesday, December 24, 2024
Homeराज्यश्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार...

श्रद्धा कांबळी यांना सावित्री- फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार…

मुंबई – गणेश तळेकर

विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती श्रद्धा शैलेश कांबळी यांना शिक्षक भारतीतर्फे यंदाचा ‘सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

संवेदनशील शिक्षिका म्हणून विविधांगी शैक्षणिक काम करत असतानाच अभियान या सामाजिक संस्थेच्या उपक्रमातही त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग आहे. सुजाण, सक्षम आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

खार एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या वेळी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कल्पना शेंडे, अमोल गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: