Sunday, December 22, 2024
Homeराज्यआदिवासी शेतकऱ्याचा आर्त टाहो…माझ्या शेतातील पांढरे सोने वाचवा हो…

आदिवासी शेतकऱ्याचा आर्त टाहो…माझ्या शेतातील पांढरे सोने वाचवा हो…

आकोट- संजय आठवले

अस्मानी संकटाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या घोषणा राज्य सरकार करीत असले तरी मात्र लघु पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी आदिवासी भागातील शेतकरी अडचणीत आला असून फुटलेल्या कालव्यातून सोडलेले पोपटखेड धरणाचे पाणी त्याचे शेतात साचल्याने त्याचे कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.

आकोट तालुक्यातील दहीखेल फुटकर गावाचे शिवारात प्रकाश गजानन तायडे या शेतकऱ्याचे २.५२ हेक्टर शेत आहे. ह्या शेताचे मध्यातून पोपटखेड धरणाचा कालवा गेलेला आहे. परंतु हा कालवा दोन-तीन ठिकाणी फुटलेला आहे. तसेच एका ठिकाणी हा कालवा तुंबलेला आहे.

सद्यस्थितीत गहू पिकासाठी या काव्यातून दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. परंतु फुटलेल्या आणि तुंबलेल्या या कालव्यामुळे सदर शेतकऱ्याचे शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळे त्याचे कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. फुटलेल्या आणि तुंबलेल्या ठिकाणी या कालव्याची दुरुस्ती झाली तर पाणी घुसणार नाही. त्यामुळे ही तजवीज होणे गरजेचे आहे. सदर शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी आकोट, तहसीलदार आकोट व उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग आकोट यांना निवेदन देऊन सदर कालवा दुरुस्त करण्याची व आपले झालेले रुपये १ लक्ष नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात लघु पाटबंधारे उप अभियंता नितीन खाटके यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. मात्र सहाय्यक अभियंता तिजारे यांनी सांगितले की, सदर कालव्याचा पंचनामा करण्यात आला आहे. आता दोन दिवस कालवा बंद ठेवण्यात येऊन त्याची दुरुस्ती करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: