नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड येथील कैलास नगर मधील रहिवासी मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय चौदंते यांचे सुपुत्र सौरभ चौदंते यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या एल. एल. एम. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एल.एल.एम. ही कायद्याच्या क्षेत्रातली अतिशय अवघड पदवी समजली जाते. या परीक्षेला मास्टर ऑफ लॉ असेही संबोधले जाते. सौरभचे एल.एल.बी. चे शिक्षण नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथेच झाले असून, एल. एल.एम. चे शिक्षणही याच महाविद्यालयात झाले.
लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचा असलेल्या सौरभने फक्त 24 व्या वर्षी सदरील अवघड परीक्षा पास होऊन सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्याची दारे उघडली आहेत. आज घडीला सौरभ हा पुणे येथील नामांकित असलेल्या क्लावून मायो या कंपनीचा अधिकृत अडवायजर म्हणून काम करीत असून भविष्यात तो सर्वोच्च न्यायालयातला मानांकित वकील होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
सौरभच्या उपरोक्त यशाचे कंधार येथील वैद्यकीय अधीक्षक तथा नांदेड येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉक्टर लोणीकर, प्रसिद्ध ललित साहित्यिक मिलिंद ढवळे, प्राध्यापिका सौ. पुष्पा क्षीरसागर, पंचायत विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त मॅनेजर सदाशिव चौदंते, शिलेश ढोले, मुंबईचे बँक मॅनेजर अशोकराव क्षीरसागर, भोकर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. वनमाला क्षीरसागर, पत्रकार संजय कदम, डॉक्टर शर्मिष्ठा ढवळे, डॉक्टर साक्षी चौदंते, आदींनी कौतुक केले आहे.