सत्यशोधक : अकोल्यात सध्या मोठा चर्चेचा विषय सुरु आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकरांच्या मुलाखतीचा. या मुलाखतीत बाळासाहेबांनी बरेच खुलासे केले असल्याचे दिसत आहे. त्यांची मुलखात सत्यशोधक चित्रपटातील महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका करणारे अभिनेते संदीप कुलकर्णी आणि याच चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पार पडलेल्या जाहीर मुलाखतीत या दांपत्याने अनेक गौप्यस्फोट केलेय. मुलाखतीवेळी सुजात आंबेडकरांचीही उपस्थिती होतीय. मुलाखतीपुर्वी प्रकाश आंबेडकरांचा फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी आंबेडकरांनी क्रांतीची प्रतिकात्मक मशाल़ पेटविलीय.
यावेळी प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकरांसह सुजात आ़ंबेडकरांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केलेय. यावेळी बोलतांना प्रा. अंजली आ़ंबेडकरांनी 2017 नंतर कलबुर्गी, गौरी लंकेशच्या हत्येनंतर आमच्याही कुटूंबात अस्वस्थता निर्माण झाल्याचा गौप्यस्फोट केलाय. त्यावेळी आपण कुटू़बियांसाठी सुरक्षा घेण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरानी फेटाळल्याचा गौप्यस्फोट प्रा. अंजली आंबेडकरांनी केलाय. यासोबतच प्रकाश आंबेडकरांसोबतचा प्रेमविवाह, त्यांच्यासोबतच्या भेटी, घरातील लुटूपुटूची भांडणं, 2024 मध्ये सुजात आंबेडकरांचं संभाव्य लढणं आणि लग्न यावर मोठे गौप्यस्फोट या मुलाखतीत झालेय.
दरम्यान, 2024 मध्ये विधानसभा लढणार का? आणि लग्न करणार का? या विषयावर बोलतांना आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘पहिले लगीन लोकसभेचं असं सुचक उत्तर दिलंये.
मुलाखत : प्रकाश आणि प्रा. अंजली आंबेडकर.
प्रश्न : सावित्रीसारखाच संघर्ष तुमच्या आयुष्यात आला का?
प्रा. अंजलीताई : आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं याचं फार मोठं समाधान आणि आनंद
प्रश्न : या महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही. वंचितला सत्ता मिळाली तर तो चेहरा कोण असेल?.
प्रा. अंजलीताई : ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस. (लोकांमधून अंजली आंबेडकरांचं नाव)
प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असुनही एव्हढं साधं कसं वागता?
बाळासाहेब : यासंदर्भात लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. मी वेगळा आहे हे वाटणं हे कृत्रिम जगणं.
प्रश्न : सध्या दहशतीचे वातावरण असतांना एक व्यक्तीच बोलत असतो. कोणतीही सुरक्षा नसते.
बाळासाहेब : तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल. कोणता हेतू नसेल तर विरोधकही तुम्हाला स्विकारतात.
प्रकाश आंबेडकर : मी स्वायत्त. माझा राजा मीच. नियम पाळणं हे मला जगण्यापुरते बाकी माझा राजा मीच. आपण स्पष्ट असलो तर कुणाचीच भिती बाळगण्याची गरज नाही.
प्रकाश आंबेडकर : कलबुर्गी, दाभोळकर त्यांना जे वाटतं ते मांडायचे. शेवटी कुणाला पटत नाही म्हणून मांडणं थांबवायचे का?. शेवटी समाजामध्ये आपल्याला जे घडवावे वाटते ते घडवले पाहिजे. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असलं पाहिजे. त्यामुळे आपण लढत रहायचं हे ठरवलं.
अंजलीताई : कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांचं झालं तेंव्हा आम्हालाही काळजी वाटायची. आम्ही सुरक्षा घ्यावी असा प्रस्ताव आम्ही बाळासाहेबांकडे मांडला होता परंतू त्यांनी तो फेटाळला.
प्रश्न : राज्यसभेचा खासदार म्हणून संसदेची पहिली पायरी चढतांना मनात काय भावना होती?
बाळासाहेब : मी जेंव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेंव्हा चालत गेलो. तेंव्हा संसदेची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी गेल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी स्वागत केल्यानं अवाक झालो. एक इतिहास समोर न्यावा लागेल अशी भावना होती. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं.
प्रश्न : संविधान योग्य लोकांच्या हाती आहे का?. सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं.
बाळासाहेब : दोघांचाही कामाबद्दल खुश नाही. दोघांमधील रेष पुसट. ही रेष कॉम्परमाईज झाल्यासारखं वाटतं.
प्रश्न : संविधान धोक्यात आहे का?
बाळासाहेब : 1950 साली ज्या संघटनांनी संविधान मानत नाही, अशी भूमिका घेतली त्या संघटना आजही कार्यरत. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का?. सरदार पटेलांनी जी भिती व्यक्त केली ती भिती आजही आहे.
बाळासाहेब : जरांगेंचं उपोषण सोडवायला न्यायधीश जात असेल हे वेगळे प्रकरण. ते समुहाचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते.
बाळासाहेबांच्या कुटुंबाचा संघर्ष?
बाळासाहेब : माझे वडील, काका कधी दहावी पास झाले नाहीत. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे त्यांना अभ्यासाला कदाचित वेळ मिळाला नव्हता.
प्रश्न : वर्ष 2024 मध्ये सुजातसाठी ‘यंदा कर्तव्य आहे’ का?
सुजात : पहिलं कर्तव्य अकोला लोकसभेचं.
सुजात : माझ्या प्रत्येक प्रश्नाचं न थकता आतापर्यंत आई-बाबांनी उत्तरं दिलीत. त्यामुळेच मी घडू शकलो.
प्रश्न : एकत्र कुठला सिनेमा पाहिला
अंजलीताई : तो आठवत नाही. दोघांनीही मात्र शर्मिला टागोरचा एकही सिनेमा चुकवला नाही.
प्रश्न : तुमच्या लग्नाची गोष्ट
बाळासाहेब : काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या.
अंजलीताई : काही मित्रांनी जमवून दिलेला आमचा प्रेमविवाह. पहिली भेट भारिपच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात. तेंव्हाही बाळासाहेब फेमस. मग भेटायचं कुठे हा प्रश्न पडायचा. आम्ही अनेकदा ट्रेनमध्ये दोन-तीन स्टेशनमध्ये सोबत प्रवास करीत भेटायचे. तेंव्हा मी जळगावला नोकरी करायचे. बाळासाहेब प्रचंड हळवे
प्रश्न : घरात भांडणं होतात का?
अंजलीताई : टूटपेस्टची कॅप का लावली नाही येथपासून तर वंचितच्या निर्णयापर्यंत अनेक विषयांवर आम्ही भांडतो.
अंजलीताई : अनेकदा सुजात आणि बाळासाहेबांमध्ये मुद्द्यांवर भांडणं होतात. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसते.