बॉलीवूडचे दमदार अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक आता या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. त्यांची मुलगी वंशिका हिनेही अलीकडेच आपल्या वडिलांची आठवण काढली आणि तिने सतीश कौशिक हे अनुपम खेरपेक्षा चांगले नर्तक होते अस म्हटले. वास्तविक वंशिकाने पहिला रील तिच्या अनुपम काकांसोबत केला होता. दोघांचा हा व्हिडिओ खूपच क्यूट असून चाहत्यांना खूप आवडला.
या व्हिडिओमध्ये सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका बसून गाण्यावर लिप सिंक करत आहे. त्याच्या मागे अनुपम खेर उभे आहेत. ते वंशिकाची कॉपी करत आहेत. दोघेही खूप आनंदी आणि क्यूट दिसत आहेत.
हा रील शेअर करताना वंशिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अनुपम काकासोबत माझी पहिली रील. त्याला अजून थोडी रिहर्सल करायची आहे, त्याच्या तुलनेत पापा एक चांगले डान्सर होते. पण प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद अनुपम काका. तुमच्यावर माझे प्रेम आहे.’ हृतिक रोशनने या व्हिडिओवर ‘Haha sweet’ अशी कमेंट केली आहे.
गुरु रंधावा यांनी हार्ट इमोजी कमेंट केले. त्याचवेळी चाहते अनुपम खेर यांचे कौतुक करत आहेत आणि असे म्हणत आहेत की, ईश्वर असा मित्र सर्वांना देवो. खर तर जिवलग मित्र सतीश कौशिकच्या जाण्यानंतर, अनुपम खेर आणि अनिल कपूर हे दोघेही वंशिकाची पूर्ण काळजी घेत आहेत. वंशिकाला तिच्या वडिलांची कधीही कमतरता वाटू नये अशी त्याची इच्छा आहे.