रामटेक – राजू कापसे
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे,आचारसंहिता लागू झालेली आहे. अशातच सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन न होण्यासाठी सशस्त्र सीमा बलाची एक तुकडी रामटेक मध्ये दाखल झालेली आहे.काल संध्याकाळी या तुकडीने शितलवाडी येथे रूट मार्च केले.
त्या अगोदर रामटेकचे डीवायएसपी रमेश बरकते साहेब यांनी या तुकडीचे संचालन करत असताना रामटेक बद्दलची माहिती या सेना बलाला दिली. बरकते साहेब यांनी या सेनाबलला सांगितले ती कशाप्रकारे आपल्याला होणाऱ्या निवडणुकीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवायची आहे.
एखाद्या बुथवर जर गोंधळ झाला तर त्याला कशाप्रकारे आळा घालायचा याबद्दलची माहिती त्यांना देण्यात आली. सशस्त्र सेना बलाची ही विशेष तुकडी निवडणुकीसाठी बोलण्यात आली असून त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मनसर येथील रेस्ट हाऊस येथे करण्यात आलेली आहे असे बरकते साहेब यांनी सांगितले.
या रूट मार्चच्या वेळी रामटेक चे डीवायएसपी बरकते साहेब, रामटेक चे ठाणेदार शेटे साहेब आणि रामटेक पोलीस बल उपस्थित होते.