Thursday, September 19, 2024
Homeराज्यसर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान...

सर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान…

रामटेक – राजु कापसे

सध्या पावसाळा सुरू असून साप पाठोपाठ घोरपड या काळात आढळून येत आहे. अशीच ऐक घटना रविवार 31 जुलै रोजी रामटेक शहरात शनिवारी वार्ड येथे धनंजय महाजन यांचा राहत्या घरी कोंबड्याच्या बेडव्यात 4 फूट लांब घोरपड आढळून आली वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संघटक प्रमुख सर्पमित्र सागर धावडे यांनी घोरपडीला पकडून जीवनदान दिले
रामटेक येथिल रहिवासी धनंजय महाजन यांचा निवासस्थानी घोरपड आढळून आली.

या संदर्भात त्यांनी सर्पमित्र सागर धावडे यांना संपर्क साधून माहीत दिली घटनास्थळ गाठून घोरपड पकडून तिला निसर्गसानिध्यात सोडून दिले. रामटेक शहर व तालुक्यात घोरपड आढळून येतात त्यांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या घरात परिसरात आढळून आल्यात त्या वर बारकाईने नजर ठेवून वन विभाग किंवा सर्पमित्र संपर्क साधावा जेणे करुन घोरपडीला वाचवण्यात मदत होईल असे आवाहन सर्पमित्र सागर धावडे यांनी केले.

” सर्वजण रक्षक होऊ या शेतात गावात निघाल्यास तिला सुरक्षित करा अंधश्रध्दे मुळे मानवी खारवट हव्यासापोटी हा प्राणी मानवी भक्ष्य होतो त्यावेळी ज्ञानघेऊन सर्वजण घोरपडी चे रक्षक होऊया या प्राण्याला वाचूया असे आवाहन सर्पमित्र सागर धावडे यांनी केले “

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: