Sunday, December 22, 2024
Homeक्रिकेटSarfaraz Khan | पहिल्या डावात सरफराजसाठी जडेजा ठरला खलनायक…सोशल मिडीयावर जोरदार चर्चा...

Sarfaraz Khan | पहिल्या डावात सरफराजसाठी जडेजा ठरला खलनायक…सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…

Sarfaraz Khan : पहिल्याच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा सरफराज खान ६२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सर्फराज खान कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला. हे पाहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मालाही राग दाखवण्यापासून रोखता आले नाही. तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. सरफराज खानच्या पदार्पणानंतर वडिलांसह त्याचे सर्व चाहते भावूक झाले.

रोहित शर्मा आऊट असताना सरफराज खान मैदानात जात होता. त्यावेळी स्वतः रोहित शर्माने सर्फराज खानचे अभिनंदन केले होते. मात्र त्यानंतर त्याने फलंदाजी सुरू केली तेव्हा सर्फराज खानला शतक झळकावण्यापासून इंग्लंडचा कोणताही गोलंदाज रोखू शकणार नाही, असे वाटत होते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी नव्हे तर रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज खानचा डाव अवघ्या 62 धावांवर संपुष्टात आला आणि त्याला शतक झळकावण्यापासून रोखले.

जडेजाने चुकीचा कॉल केला
इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या सरफराज खानने अवघ्या 48 चेंडूत कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर कारकिर्दीतील पहिल्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. सर्फराज खानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही वेगवान खेळ सुरूच ठेवला. मात्र जडेजा फलंदाजी करत असताना समोरून जेम्स अँडरसनचा एक चेंडू खेळून त्याने धावांची मागणी केली.

पण चेंडू वेगाने वुडकडे जात असल्याचे पाहून जडेजाने धाव घेण्यास नकार दिला. मात्र, जडेजाने धाव घेण्यास नकार दिल्याने सर्फराज खानने अर्धी खेळपट्टी कव्हर केली होती. वुडनेही पटकन चेंडू उचलला आणि थेट विकेटवर मारला. त्यामुळे जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज खान विकेट गमावून पॅव्हेलियनमध्ये परतला.

रोहितनेही संताप व्यक्त केला
रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलवर स्वतः कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. सरफराज खान धावबाद झाल्यावर रोहित शर्माने रागाने आपली कॅप काढली आणि ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी बोलले. सरफराज खानच्या धावबादनंतर चाहतेही जडेजाच्या वागण्यावर नाराज दिसले. सर्फराज खानने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध फटकेबाजी केली होती. तो बिनदिक्कत मोठे फटके खेळत होता. जेव्हा सर्फराज खानने अर्धशतक झळकावले. त्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: