सांगली – ज्योती मोरे
पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदाराने एक वृद्ध महिला सांगली सिविल हॉस्पिटलच्या कंपाउंड जवळ पिवळ्या साडी त उभी असून तिच्याकडे चोरीतील चांदीचे साहित्य असल्याची माहिती दिली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सदर ठिकाणी जाऊन सुप्रभा दत्तात्रय महाडिक वय 72, राहणार कोरगावकर कॉलनी, पुलाची शिरोली,तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या वृद्धेस ताब्यात घेतले असून तिची महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शुभांगी मुळीक यांनी अंगझडती घेतली असता तिच्याजवळ 7,500 रुपये किमतीचा 100ग्रॅम वजनाचा चांदीचा ग्लास, 7,500 रुपये किमतीचा 100ग्राम वजनाची चांदीची गणेश मूर्ती,
10,500 रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची मूर्ती 3000 रुपये किमतीची चांदीची पिंड 1500 रुपये किमतीची चांदीची बाळकृष्णाची मूर्ती तसंच 1500 रुपये किमतीची 20 ग्राम मोजण्याची वाटी असा एकूण 31 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या मुद्देमाला विषयी विचारला असता सदर मुद्देमाल हा मागील आठवड्यात मिरजेतील शिवाजीनगर आणि आठ महिन्यांपूर्वी सांगलीतील गावभागातील एका घरात प्रवेश करून देवघरातून सदर चोरी केल्याचं तिने कबूल केले आहे.
सदर महिलेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत महिलेसह मुद्देमाल महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शुभांगी मुळीक,
पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव,पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, पोलीस नाईक अनिल कोळेकर,पोलीस नाईक उदयसिंह माळी, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव आदींनी केले आहे.