Monday, September 23, 2024
Homeराज्यखदानीत बुडालेल्या युवकास संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाच्या जवानांनी शोधून बाहेर काढले...

खदानीत बुडालेल्या युवकास संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाच्या जवानांनी शोधून बाहेर काढले…

मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोला यांची धाडसी कारवाई

अकोला – संतोषकुमार गवई

कुंभारी ते विझोरा रोडवरील बार्शीटाकळी पोलीस हद्दीतील कुंभारी नजिक असलेल्या खदान मधे अकोल्यातील डाबकी रोडवरील गजानन नगरमधील सोनु वानखडे वय अं.(20) वर्ष हा आपल्या 7 ते 8 मित्रांसह 29 मे रोजी दुपारी पोहण्यासाठी आला होता.

यावेळी तो बुडाला असल्याची माहीती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे सर यांना माहीती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार,विष्णु केवट,अंकुश सदाफळे, ऋषिकेश राखोंडे,शेखर केवट,संकेत देशमुख,गोकुळ तायडे,संतोष वाघमारे,रोहन मुंढे,योगेश कुदळे,

यांचेसह शोध व बचाव साहित्य, जनरेटर,लाईट सेटप, आणी आपात्कालीन वाहणासह घटनास्थळी रात्री 9:00 वाजता पोहचले लगेच सिन ट्रेस केला खदान 25 / 30 फुट खोल पाणी आणी तळाशी मोठ मोठ्या टोकदार दगड चिफा असल्याचे निष्पन्न झाले अशा कंडिशन मधे अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन करण फारच अवघड असते रेस्क्युवर ला ईजा होण्याची दाट शक्यता असते,

यामुळे अतिशय बारकाईने तळाशी शोध घ्यावा लागतो ही सर्व परीस्थीती लक्षात घेऊन ठाणेदार शिरीष खंडारे सर यांच्या आदेशाने लगेच सर्च ऑपरेशन चालु केले आणी अर्ध्या तासात पथकातील जवानांनी तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला.यावेळी बार्शीटाकळी चे एएसआय विजय इंगळे साहेब,आणी पोलीस कर्मचारी तसेच नातेवाईक हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: