अमरावती – दुर्वास रोकडे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने गुरुवार दि. 26 जुलै, 2024 रोजी सकाळी 11.00 वा. विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह येथे विद्यापीठ संलग्नित पाचही जिल्ह्रांमधील महाविद्यालयांचे प्रायार्य तसेच त्यांचे विद्यार्थी विकास अधिकारी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार आहेत.
विद्यार्थी विकास विभागाकडून विद्याथ्र्यांच्या हितार्थ असलेल्या विविध योजना तसेच कार्यक्रमांचे समन्वयन साधणे, विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती, विविध पुरस्कार, आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव आदींबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व प्राचार्य व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे.