आकोट – दि. १५ ते २० असे सुमारे ७ दिवस चालणाऱ्या संस्कार शिबीरात दररोज सकाळी ७ ते ८ योगा व प्राणायाम वर्ग कॅप्टन सुनिल डोबाळे हे स्वतः घेतील.
कॅप्टन श्री सुनिल डोबाळे – थोडक्यात परिचय कॅप्टन हे ताजनापुर ता. आकोट इथले रहिवाशी असून त्यांचे ईयत्ता ५ वी ते १२ पर्यंत चे शिक्षण आपल्याच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात झाले.
१९८६ साली त्यांनी आर्मि ज्वॉईन केली व १९८८ ला कमांडो ट्रेनिंग पुर्ण करून १९९४ ते १९९६ पर्यंत सयुक्त राष्ट्र महासचिव यांचे बॉडीगार्ड म्हणून आपल्या देशाच्या सैन्याचे प्रतिनिधी या रूपात जवळ पास ३० देशात त्यांनी सर्व्हीस व भ्रमण केले.
जवळ पास ३४ वर्ष सेवा पूर्ण करून २०१९ मध्ये ते कॅप्टन पदावरून ईलेक्ट्रीक व मॅकॅनिकल इंजिनीयर असतांना ते रिटायर झालेत. त्यानंतर त्यांनी भारतीय योग विद्याधाम गुरुकूल नाशिक अंतर्गत योगा शिक्षण पूर्ण केले व त्यामध्ये ते महाराष्ट्रात प्रथम स्थानी व भारतात सातव्या क्रमांकावर होते.
आपल्या सेवा निवृत्तीच्या नंतर ते समाजकार्या सोबतच शालेय विद्यार्थ्यांचे काऊंसीलिंग करतात. त्याच प्रमाणे आपल्या तालुक्का क्षेत्रात विकास व्हावा तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता त्यांनी सि एन जी गॅस प्रकल्पाचा २५० करोड रु चा प्रकल्प तेल्हारा तालुक्यात सुरु करण्याकरीता काम सुरू केले आहे.
असे त्यांचे थोडक्यात कार्य आहे. कॅप्टन सुनिल डोबाळे हे कमांडो, इंजिनियर व योग शिक्षक असून ते दररोज ऑन लाईन व ऑफलाईन आपल्या गावात ताजनापुरला व जेथे जातील तेथे निशुल्क योगा वर्ग घेत असतात.