मूर्तिजापूर : श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळ ध्यान मंदिर परीसरात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्य घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सिद्धार्थ विद्यालयातील वैष्णवी वाकोडे, संपन्न अगमे, खुशी खंडागळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकावला यावेळी लोकमतला केलेल्या उत्कृष्ट लिखाना बद्दल संजय उमक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य रामकृष्ण गावंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, ज्ञाननर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विष्णू लोडम, माजी नगराध्यक्ष जयंती हरीया, पत्रकार संजय उमक, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष विलास वानखडे, श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रविण पांडे, अमित उपस्थित होते. श्री रामकृष्ण, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व सावित्रीआईंच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पत्रकार संजय उमक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २५१, १५१, १०१ रुपये रोख, प्रमाणपत्र व ग्रंथ तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर जयंती हरिया, प्रा.बेलाडकर, प्रा.गौरखेडे, विष्णू लोडम, रामकृष्ण गावंडे यांची भाषणे झाली. स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रमोद राजंदेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुधाकर गौरखेडे यांनी केले. शहाकर मॅडमयांनी आभार मानले.