अकोला – शिवसेना शिंदे गटाच्या बाळापूर विधानसभा प्रमुख पदी अंदूरा येथील रहिवासी तसेच राजकारण समाजकारणाचा दांडगा अनुभव असेलेले संजय रोहनकार यांची नियुक्ती करण्यात आली.
वंदनिय हिंदू ह्रुदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे व शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेप्रमाणे व अकोला जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिसन बाजोरीया व शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या सुचनेनुसार बाळापूर विधानसभा प्रमुख या पदावर संजय रोहनकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदूत्वाचा विचार आणि धर्मविर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढिसाठी आपण सर्वांना सोबत घेवून कार्य करणार असल्याचे संजय रोहनकार यांनी म्हटले आहे.