अकोला – बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यापासून नागपूरपर्यंत पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली मात्र आज सकाळीच नागपूरच्या वेशीवर या यात्रेत प्रचंड थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी नागपूरच्या वेशीवरच ही संघर्ष यात्रा अडवली. त्यामुळे देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून नेले. यावर शिवसेना नेते संजय राऊत ट्वीट करून महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरु लागले!…पोलिसांनी नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जात आहे.
बाळापुर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यापासून नागपूरपर्यंत पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली. आज सकाळी 8 वाजता ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर धडकली. मोर्चेकरी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार होते. त्यामुळे नागपूरच्या वेशीवरच वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला होता. तसेच दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली होती.
ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर येताच पोलिसांनी आंदोलकांना वेशीवरच अडवलं. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची आंदोलकांनी परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. आंदोलकांनी नागपूरच्या वेशीवर रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून नेले.
यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करीत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले…पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली सरकार जनतेलाच घाबरु लागले!…असे ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केले.