रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
रामटेक : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 13 पंचायत समिती मधील सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ नुकताच दिनांक 16 ऑक्टोंबर 2022 रोजी संपुष्ट झाला त्या अनुषंगाने रामटेक पंचायत समितीमध्ये आज दिनांक 15 ऑक्टोबरला पंचायत समिती सभापती उपसभापती पदाकरिता निवडणूक घेण्यात आली.
यामध्ये श्री संजय पुनारामजी नेवारे बोथिया पालोरा सर्कल हे ५ मतांनी सभापतीपदासाठी निवडुन आले तर श्री. नरेंद्र चंदनजी बंधाटे शितलवाडी सर्कल हे ५ मतांनी उपसभापतीपदासाठी निवडुन आले. यावेळी विरोधकांना ४ मते मिळालेली होती. विरोधकांमध्ये सभापती पदाकरीता रविंद्र रामप्रसाद कुंभरे हे तर उपसभापती पदाकरिता सौ. अस्मिताताई बिरणवार या उमेदवार होत्या. निवडणुकीदरम्यानचे नियोजन यावेळी तहसिलदार बाळासाहेब मस्के, बि.डी.ओ. जयसिंग जाधव व विस्तार अधिकारी जगने यांनी सांभाळले.
रामटेक पंचायत समितीची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज दिनांक 15 /10/ 2022 रोजी बाळासाहेब म्हस्के तहसीलदार रामटेक तथा पिठासिन अधिकारी रामटेक, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभा दुपारी तीन वाजता सुरू झाली .आज सकाळी 11 ते 1 या कालावधीत नामनिर्देशन पत्र वाटप करण्यात आले. तसेच स्वीकारण्यात आले. सदर सभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले तसेच उपसभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.
छाननीअंती सभापती पदासाठी संजय पुनाराम नेवारे व रवींद्र रामप्रसाद कुमरे या दोन सदस्यांचे अर्ज वैध ठरले. तसेच मतदानाअंती संजय पुनरामजी नेवारे यांना एकूण पाच मते मिळाली व रवींद्र रामप्रसाद कूमरे यांना चार मते मिळाली. त्यामुळे संजय पुनरामजी नेवारे हे सभापती पदी विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपसभापती पदासाठी नरेंद्र बंधाते व अश्विता बिरणवार या दोन पंचायत समिती सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. सदर दोनही अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यामधून मतदानाअंती नरेंद्र बंधाटे हे पाच मते मिळून उपसभापती पदी विजय झाले.