Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingसंजय दत्त शूटिंग दरम्यान गंभीर जखमी...चित्रपटाच्या ब्लास्ट सिक्वेन्स शूट करतांना घडला अपघात...

संजय दत्त शूटिंग दरम्यान गंभीर जखमी…चित्रपटाच्या ब्लास्ट सिक्वेन्स शूट करतांना घडला अपघात…

संजय दत्त बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, मात्र अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाले आहेत. अभिनेता सध्या त्याच्या आगामी कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’ साठी बेंगळुरूच्या परिसरात शूटिंग करत आहे. हा अपघात झाला तेव्हा तो चित्रपटातील ब्लास्ट सिक्वेन्सचे शूटिंग करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या दृश्याच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त गंभीर जखमी झाले. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या हाताला, चेहऱ्याला आणि कोपरावर जखमा झाल्या आहेत. ते फाईट मास्टर रवि वर्मा यांच्या KD: The Devil या चित्रपटासाठी फाईट सीनची तयारी करत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि अभिनेता त्याचा बळी ठरला. संजय दत्त बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. या घटनेनंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्त KGF चॅप्टर 1 आणि 2 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटात त्याच्यासोबत रवीना टंडन दिसली होती. ‘केडी: द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त अखेरचा ‘शमशेरा’ चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: