Sunday, December 22, 2024
HomeराजकीयSanjay Dutt | अभिनेता संजय दत्त कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार ?...संजय दत्त...

Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्त कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार ?…संजय दत्त म्हणाले…

Sanjay Dutt:-बॉलीवूड स्टार संजय दत्त 2024 ची लोकसभा निवडणूक हरियाणामधून लढवू शकतो, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष सेलिब्रिटी कार्ड खेळणार आहे. पक्ष हायकमांडने संजय दत्त (Sanjay Dutt Fight Election) यांच्या नावावर सहमती दर्शवल्याची बातमी आहे.

संजय दत्त हा एक बॉलिवूड अभिनेता आहे. त्यांचे वडील सुनील दत्त मुंबईचे खासदार आणि मंत्री राहिले आहेत, त्यांची बहीण प्रिया दत्तही खासदार राहिली आहे. आता ते कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. संजय दत्तचे हरियाणाशी खास नाते आहे. हरियाणातील यमुनानगर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.

पण संजय दत्त ने x वर ट्विट करून सागितले आहे कि मी राजकारणात येण्याच्या सर्व अफवा दूर करू इच्छितो. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. जर मी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्याची घोषणा करणारा मी पहिला असेन.

कृपया सध्या माझ्याबद्दलच्या बातम्यांमध्ये जे काही प्रसारित केले जात आहे त्यावर विश्वास ठेवण्याचे टाळा. या ट्विट ने संजय दत्त येणी सर्व लोकसभा निवडणूक हरियाणामधून लढवू शकतो बातमी ला खोटे सागितले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: