अमरावती – दुर्वास रोकडे
नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षकांचे काम सगळ्यात कठीण असते. याचे कारण शहराची स्वच्छता हा नगर प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा विषय असून स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी मोठी असते, असे उद्गार अमरावती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर यांनी व्यक्त केले.
अमरावती येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती उपकेंद्रावर रविवारी न्यू हायस्कूल बेलपुराच्या सभागृहामध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या रेग्युलर व हॉलिडे अशा दोन्ही बॅचचे उद्घाटन आयोजित भूषण पुसदकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरुषोत्तम दाळू, माजी प्राचार्य कुटुंब कल्याण व आरोग्य प्रशिक्षण केंद्र अमरावती होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती महानगरपालिकेचे राजापेठ झोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर व वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, संस्थेचे माजी विद्यार्थी राजेश राठोड, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक हे उपस्थित होते.
सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील असे कौशल्य सर्व विद्यार्थ्यांनी शिकून घ्यावे. कामाला समजून घेण्यासाठी अमरावती महानगरपालिका या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करेल असे आश्वासन भूषण पुसदकर यांनी दिले.
राजेश राठोड यांनी विद््यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जयंत पाठक यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशिस भातकुले यांनी केले. जयंत पाटील यांनी अभ्यासक्रमाच्या शिक्षण कार्यपद्धतीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक राजेश राठोर, माजी आरोग्य संचालक डॉ. पुष्पा थोरात, डॉ. शामसुंदर निकम, डॉ. दिलीप निकोसे, एस डी वडनेरकर, प्रफुल्ल नीमकर, अनिता तेलंग, डॉ. प्रज्ञा बनसोड तसेच, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी अमरावती विभागाचे कार्यक्रम अधिकारी सोहम कुलकर्णी आणि रवींद्र मावस्कर यांनी प्रयत्न केले.