पातूर – निशांत गवई
पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगोळा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजना लाटण्यासाठी चक्क ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या व बनावट शिक्का मारून शासनाच्या योजना लाटण्याचा व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार ३आगस्ट रोजी उघड झालां होता.
यावर ग्रामसेवक व ग्रामस्थांनी चांन्नी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती मात्र बराच कालावधी उलटूनही गुन्हे दाखल न झाल्याने तक्रारकर्ते रामेश्वर जाधव यांनी पातूर न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी आदेश पारित करून गुन्हे दाखल करण्याचे चांनी पोलिसांना आदेश दिले आहेत
पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगोळा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजना लाटण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार येथील नितीन निवृत्ती ढाकरे, नामदेव गजानन जाधव, दिलीप नामदेव ढाकरे, पूजा नितीन ढाकरे यांनी पातूर पंचायत समिती मधे अर्ज दाखल केले होते सदरचे दाखल करण्यात आलेले,
अर्ज ग्रामसेवक एस एस गवई यांच्या निदर्शनास आले असताना हया अर्जावर आपल्या सह्या किंवा शिक्का नसून हा गैरप्रकार झाला असल्याचे निदर्शनास आल्याचा प्रकार घडला या विषयी ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी चांन्नी पोलीस स्टशनमध्ये तक्रार दाखल केली होती मात्र बराच कालावधी उलटूनही चानी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने अखेर सागोळा येथिल रामेश्वर जाधव ग्रामस्थांनी पातूर न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
पातूर न्यायालयात याचिकेच्या सुनावणीमध्ये नितीन निवृत्ती ढाकरे, पूजा नितीन ढाकरे ,नामदेव गजानन जाधव, दिलीप नामदेव ढाकरे, यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा सहिता २०२३ नुसार कलम १७५(३) नुसार चांन्नी पोलिस स्टेशन चे अधिकारी यांनी एफ आय आर दाखल करून गुन्हे दाखल करण्याचा आदेश पातूर न्यायालयाचे न्यायधीश के के कुरंदले यानी आदेश पारित केला असून फिर्यादी च्या वतीने ॲड गजानन भोपळे (तांदळी) अकोला यानी काम पहिले.