रामटेक – राजू कापसे
शहरातील रामजी महाजन नगर परिषद विद्यालय चा विद्याधी वंश भोजराज सांगोडे याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा ( एन.एम.एम. एस.)- २०२४ परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याने त्याची निवड होवुन तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचा शाळेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला असुन घवघवीत यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
भारत सरकार शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली मार्फत ही परीक्षा घेतली जात असते.
त्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन दरमहा वर्ग ९ ते १२ वी पर्यंत १००० रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते. २४ डिसेबर २०२३ ला वंशं ने ही परीक्षा दिली व महाराष्ट्रातील दोन लक्ष सहासष्ट हजार तिनशे बावन्न विद्यार्थ्यांपैकी अकरा हजार सहाशे ब्यानशी विद्यार्थी पात्र ठरले. त्यात वंश भोजराज सांगोडे हा सुद्धा पात्र ठरला. वंश ने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मिलींद चोपकर व सर्व शिक्षकांना दिले आहे.