जगातील चौथ्या क्रमांकाचे दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हे शिखर सर करण्याचा तिने केला संकल्प…
सांगली – ज्योती मोरे.
मी काजल दयानंद कांबळे बारा वर्षापूर्वी एसटी धडकल्याने अपघात होऊन माला ४९% अपंगत्व आलेले आहे. त्यात माझ्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने सामान्य परिस्थिति असताना अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया केल्या परंतु त्यात माझा एक पाय (डावा) उंचीला कमी झाला व कायमचे अपंगत्व आले.
अशा ही परिस्थितीत मी शिवुर्जाप्रतिष्ठान चे श्री. शिवाजी गाडे यांचासोबत तीन वेळेस (१ जानेवारी २०२१, १ जानेवारी २०२२ व १ जानेवारी २०२३) महाराष्ट्रातील सर्वोच कळसूबाई शिखर सर केले आहे. त्याचसोबत पॉइंट ब्रेक अडवेंचर सोबत ८ मार्च २०२१ रोजी महिलादिनी २५० फुट उंच ९०अंश सरळसोट असणारा अत्यंत कठीण अवघड असा वजीर सुळका आणि ८ मार्च २०२२ रोजी हिरकणी कडा २७००फुट उंच सर केला आहे.
तसेच आतापर्यंत अंकाई-टंकाई, खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग, रेवदंडा, बिरवडी किल्ला, कोरलाई किल्ला, मुरुड जंजिरा, कुलाबा, बोरीगड, पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती, ४०० फुट उंच मोरोशीचा भैरवगड, डांग्या सुळका 200 फुट आणि संडे वन सुळका २८० फुट उंच सर केला आहे मार्च २०२२ केला आहे. वजीर सुळका, हिरकणीकडा, भैरवगड, डांग्या सुळका संडे वन सुळका हे अत्यंत कठीण सुळके गड करणारी मी महाराष्ट्रातील पहिली दिव्यांग महिला ठरली आहे.
यापुढे ही मला महाराष्ट्रातील आणि हिमालयातील अनेक शिखरे सर करण्याची इच्छा आहे. जगातील सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करण्याची मनिशा आहे. त्यातीलच एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर किलीमांजारो..
अफिकेतील सर्वात उंच व जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच पर्वत किलीमांजारो हे कोणत्याही पर्वतरांगेत नसून तो ज्वालामुखींपासून तयार झालेला पर्वत आहे. मला दक्षिण आफ्रिका येथील हे सर्वोच्च व अवघड शिखर माऊंट किलीमांजारो (शिखर ऊंची १९३४१ फुट उंच असून ५९५१ मीटर आहे). १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छ. शिवाजी महाराज जयंती दिनी सर करून आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावरून शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून या शिवजयंतीला स्वराज्याचा भगवा झेंडा तसेच भारताचा तिरंगा फडकवून शिवजयंती साजरी करण्याची इच्छा आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानेच हे होऊ शकेल.* हि मोहीम एकूण दहा दिवसाची असून ६ फेब्रुवारी रोजी टांझानिया येथे रवाना व्हावे लागेल, हे शिखर मी सोलापूरचे माऊंट एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोर सोबत सर करणार आहे. *हे शिखर सर करणारी मी महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला असेन.* परंतु त्यासाठी ६,७४,०००/- रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. घरच्या परिस्थितीमुळे मला हा खर्च करणे अशक्य असून परवडणार नाही. परंतु माझी दुर्दम्य इच्छा असल्याने आपण मला आर्थिक मदत केल्यास मला हे शक्य होणार आहे. मला वरील बाबीसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊन सहकार्य
व उपकृत करावे ही नम्र विनंती. आर्थिक मदत माझ्या बँक ऑफ इंडिया, शाखा- विश्रामबाग खाते नं. १५०७१०११००२३८०८ (आयएफएससी कोड : BKID0001507) वर वर्ग करावी
ACCOUNT HOLDER NAME:
KAJAL DAYANAND KAMBLE
ACCOUNT NUMBER :
150710110023808
IFSC CODE : BKID0001507
BANK NAME : BANK OF INDIA.
Mob No. – 8378072759
Phonepe – 8378072759