Sunday, December 22, 2024
Homeखेळनॅशनल तायक्वांदो चॅम्पियन्स स्पर्धेत सांगलीकर खेळाडूंची बाजी १२ सुवर्ण २७ रौप्य तर...

नॅशनल तायक्वांदो चॅम्पियन्स स्पर्धेत सांगलीकर खेळाडूंची बाजी १२ सुवर्ण २७ रौप्य तर १७ कास्य पदकं जिंकली…

सांगली – ज्योती मोरे

स्टेअर्स फाउंडेशन ऑर्गनायझेशन नॅशनल चॅम्पियनशिप 2023 नवी दिल्ली आयोजित इंदिरा गांधी स्टेडियमवर संपन्न झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सांगली जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी बाजी मारत तब्बल 12 सुवर्ण सत्तावीस रौप्य तर 17 कास्य पदकं मिळवून महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांक मिळवून दिला.

दरम्यान कुस्ती आणि वेटलिफ्टिंग नंतर आता सांगलीचं नाव तायक्वांदो खेळातही नावारुपाला येईल यात शंका उरलेली नाही. या स्पर्धेत एकूण 56 पदकं घेऊन आलेल्या सर्व खेळाडूंचं आगमन आज सायंकाळी मिरज रेल्वे स्टेशनवर झाल्यानंतर पालकांनी सर्व विजेत्या खेळाडूंचं आणि प्रशिक्षक सुरेश चौधरी यांचं जल्लोषात स्वागत केलं.

पूर्णपदक विजेत्या स्पर्धकांमध्ये नेहा तरामू, आराध्या आयरेकर, श्रुती कलगुटगी, तनया टवळ,शुभ्रा टवळ, जानवी तोरणे, आयुष चव्हाण, साक्षी भजबळे, श्रावणी कोरे, अनुष्क गद्याबगोल, अनया चौगुले,उर्मिला मलमे, आदींचा तर रौप्य पदक विजेत्यांमध्ये अंकिता हंगिरकर, साक्षी शिवशरण, बशिरा कलमडे,श्रेया भंडारे, श्रेया वाडकर, साक्षी दरोडे,करुणा जाधव, अंजली चव्हाण, युवराज माळी,स्वरा औंधकर, साक्षी औंधकर, व सुयश पांढरे यांचा समावेश आहे.

तर कास्यपदक विजेत्यांमध्ये गिरीजा पवार, शुभ्रा टवळ ,तृप्ती कलगुटगी, आर्यन घोलप, आरती काळे, पूर्वा काळे, कपिल जाधव,सार्थक भोसले, वेदांत कदम, सिद्धी गवळी, रोनित साळुंखे, आर्यन धुमाळ, आदींसह इतरही खेळाडूंचा समावेश आहे. सदर स्पर्धेसाठी कोच सुरेश चौधरी यांच्याबरोबर रेफरी म्हणून भीमा मुळके यांनीही काम पाहिलं.

सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये नेहा तरामू ही मूळची भारत नेपाळ सीमेवरील असून सध्या ती सांगलीत वास्तव्यास आहे.तिचे वडील हे विश्रामबाग मध्ये एका चायनीज हॉटेलमध्ये कामगार आहेत. अशा अनेक स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके मिळवली आहेत. अशा खेळाडूंना सांगलीतील लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: