सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.
भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित सांस्कृतिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियाताई बेर्डे या येत्या 8 एप्रिल रोजी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यात सांगली शहरात विविध कार्यक्रम ठेवले आहेत. दिनांक आठ तारखेला सकाळी त्या सांगली येथे अकरा वाजता पोहोचतील. श्री गणेश मंदिर सांगली येथे दर्शन घेऊन दीनानाथ नाट्यगृह सांगली आणि बालगंधर्व नाट्यगृह मिरजची पाहणी तसेच महाराष्ट्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या मध्यवर्ती नाट्यगृहच्या जागेची पाहणी, पत्रकार परिषद, सांस्कृतिक आघाडीच्या विभागाची बैठक, महिला लघुउद्योगाच्या स्टॉल्स ना भेटी, दत्त मंगल कार्यालय सांगली येथे हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक आघाडीच्या नवीन नियुक्तीपत्रांचे वाटप तसेच प्रियाताई बेर्डे यांना महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक आघाडी पदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
ह्या त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र आमले आणि प्रदेश सहसंयोजक श्री व्यंकटेश बिदनुर उपस्थित राहणार आहेत. सौ माणिक जोशी, सौ अपूर्ण पटवर्धन आणि श्री गोवर्धन राजे हस्बनिस सचिन पारेख हे या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष ओमकार शुक्ल आणि सांगली जिल्हा अध्यक्षा सौ अपर्णा गोसावी यांनी आज पत्रकारांना दिली.