Monday, December 23, 2024
Homeराजकीयभाजप सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांचा सांगली दौरा संपन्न...

भाजप सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांचा सांगली दौरा संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सांस्कृतिक आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांचा सांगली दौरा काल संपन्न झाला. सांगलीतीचे आराध्य दैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन, दीनानाथ नाट्यमंदिर, महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेल्या सांगली येथिल हनुमान नगर मधील नियोजित नाट्यगृहाच्या जागेची पाहणी, महिलांच्या घरगुती उद्योगाच्या उत्कर्षिनी स्टॉलची पाहणी, विभागीय बैठक आणि महिलांसाठी चैत्रागौरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला.

महाराष्ट्रातील कलाकार तंत्रज्ञ कर्मचारी यांच्यासाठी चांगले काम करण्याचे आणि नवोदित कलाकार तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या कलाकार तंत्रज्ञान यांना सहकार्य मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या विभागीय बैठकीत त्यांनी सांगली कोल्हापूर येथून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सर्व कलाकारांना एकत्र करून कलाकार आणि पक्ष यांच्यात समन्वय साधून कार्यकर्त्यांनी संघटना बळकट करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाळी आटपाडी खरसुंडी जयसिंगपूर येथे भाजपा सांस्कृतिक पोस्टची स्थापना करण्यात आली कोल्हापूर येथील महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उत्कर्षीनी स्टॉलच्या सर्व स्टॉलवर त्यांनी भेट दिल्या. तर सायंकाळी त्यांचा भव्य सत्कार भाजपा सांस्कृतिक आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला.

हळदीकुंकू समारंभप्रसंगी त्यांनी 500 पेक्षा जास्त महिलांच्या बरोबर संवाद साधून त्यांना हळदी कुंकू लावून फोटो देखील काढले. प्रियाताई बेर्डे या सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी महिलांची संवाद साधल्यामुळे महिलांच्यामध्ये उत्साह दिसून येत होता. या दौऱ्यात भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्रजी आमले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ओमकार शुक्ल, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश बिदनूर,

प्रदेश सदस्य माणिकताई जोशी उपस्थित होते. सांगली जिल्हा अध्यक्ष सौ अपर्णा गोसावी, सौ अपर्णा पटवर्धन, श्री सचिन पारेख, श्री गोवर्धन हसबनीस, मौसमी पटवर्धन, एडवोकेट पूजा शिंगाडे, सौ अनुजा कुलकर्णी, सौ रश्मी सावंत, राजन काकिर्डे अस्मिता पत्की, शुभम पत्की, यांनी दौऱ्याचे नियोजन केले. कार्यक्रमामध्ये महिला आघाडी जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्वाती शिंदे भाजपा सभाग्रह नेत्या सो भारती दिघडे,

नगरसेविका उर्मिला बेलवलकर, श्री केदार खाडिलकर,सौ जयश्री कुरणे, अनघा कुलकर्णी, श्री शुभम कुलकर्णी सुप्रिया जोशी, प्राची पाठक, भाजपा सांस्कृतिक आघाडी कोल्हापूर महानगर प्रमुख सतीश अंबर्डेकर, शंकर देशपांडे, सौ मानसी गुळवणी उपस्थित होते. एडवोकेट पूजा शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले स्वागत प्रास्ताविक व अपर्णा गोसावी यांनी केले श्री नरेंद्र आमले श्री ओंकार शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले, श्री सचिन पारेख यांनी आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: