सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
गुप्त बातमीदार आणा दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेने जत तालुक्यातील गुड्डापूर मधून चोरीची गाडी विक्रीसाठी आलेल्या मोदीनसाब सरदार साब वालीकर.वय-21,राहणार-हैनाळ, तालुका- इंडी, जिल्हा- बेळगाव या गुन्हेगारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडी संदर्भात चौकशी केली असता,
सदरची गाडी गुड्डापूर यात्रेतून चोरल्याचे सांगितले. याबाबत जत पोलिसात चौकशी केली असता याबाबत गुन्हा दाखल असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता ,त्यानं अशा प्रकारे 11 मोटरसायकल गुड्डापूर, अथणी, कोकटनुर या ठिकाणच्या यात्रेतून चोरल्याचे सांगितले. शिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे 4 मोबाईल चोरल्याचे सांगितले. सदर मोटर सापडली आणि मोबाईल व्हसपेट गावच्या हद्दीत दावल मालिक देवस्थानाच्या समोरील दोन डोंगरांच्या मधील पैगंबर महबूब पाली यांच्या शेतात झाडीत लपवल्याचे सांगितले.
यामध्ये हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीच्या नऊ मोटरसायकली आणि हिरो कंपनीच्या दोन मोटरसायकली सापडले.होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल अशा एकूण 6 लाख 50 हजार रुपयांच्या मोटरसायकलींसह, नोकिया, अँप्पल,सॅमसंग, ओपो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे 91 हजार चे मोबाईल असा एकूण 7 लाख 41 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासा कामे आरोपीसह मुद्देमाल जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
सापडलेल्या सर्वच मोटरसायकली कर्नाटक राज्यातील असल्याने गाडी मालकांचा शोध सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी, आमसिद्धा खोत, अमोल ऐवळे, वैभव पाटील, सागर टिंगरे आदींनी केली.