Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसांगली | अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीसोबत आईसह प्रियकरांनं जे केलं ते...

सांगली | अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीसोबत आईसह प्रियकरांनं जे केलं ते धक्कादायकच…निर्दयी मातेसह प्रियकर ताब्यात

सांगली प्रतिनिधी :- ज्योती मोरे .

सांगली : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार लेंगरे (ता. खानापूर) येथे उघडकीस आला. सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला.

विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा आहे. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.

दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी,सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,
उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडुरंग कनेरे आणि पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: