सांगली – ज्योती मोरे
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधगाव मधील विठ्ठल बाळकृष्ण जाधव वय 34 राहणार नम्रता कॉलनी बुधगाव यांचा दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी चार वाजता अज्ञातांनी कवलापूर हद्दीतील विमानतळावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
याबाबत पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टीके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानुसार तपास सुरू असताना आर्यन देशिंगकर आणि प्रशांत माळी यांना खास बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,विठ्ठल जाधव यांचा खुन केलेले अजय संजय पवार वय 23 व दौलत सर्जेराव पवार वय 37 दोघेही राहणार गोसावी गल्ली बुधगाव, तालुका मिरज. हे सांगलीतील शंभर फुटी वरील डी मार्ट जवळ आले आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदरचा खून आपणच केल्याची कबुली या दोघांनीही दिली आहे. आरोपी आणि मयत हे तिघेही गवंडी काम करत असल्याने मयत विठ्ठल जाधव याचे दौलत पवार याच्या घरी येणे-जाणे होते आपल्या बहिणी सोबत विठ्ठल याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आल्याने विठ्ठल जाधव यास कुपवाड मधील कापसे प्लॉट वरील पाटील यांच्या बांधकामावरून गाडीवरून घेऊन जाऊन कवलापूर हद्दीतील विमानतळावर त्याच्या अंगावर, डोक्यावर, गळ्यावर तसेच हातापायांवर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
दरम्यान दोघाही आरोपींना पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.सदर कारवाई पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले, विभागीय पोलिस अधिकारी अजित टिकेे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, अनिल कोळेकर, चेतन महाजन, हेमंत ओमासे, सुधिर गोरे, संदीप नलवडे ,सचिन धोत्रे ,आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, ऋषिकेश सदामते, दीपक गट्टे, संकेत कानडे, विनायक सुतार, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली आहे .