सांगली – ज्योती मोरे
मुकुंद हनुमंत जाधवर वय वर्षे 35 राहणार हरी ओम बंगला सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटी विजयनगर सांगली यांच्याकडून प्रशांत लक्ष्मण सदामते.वय वर्षे-36, राहणार- अंजनी, तालुका तासगाव, विनोद बाळासाहेब मोरे. वय वर्षे- 42,राहणार – खंडेराजुरी, तालुका मिरज, मोनीश संजय लोखंडे, वय वर्षे- 24,राहणार- हातनुर, तालुका- तासगाव, विठ्ठलराव विश्वासराव जाधव आणि लता विश्वासराव जाधव यांनी 15 लाख रुपये खंडणी मागून,त्यापैकी साडेसात लाख रुपये वसूल करून उर्वरित साडेसात लाखांसाठी त्रास देणाऱ्या आरोपींना कंटाळून फिर्यादी जाधवर यांनी कीटकनाशक सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
उपचारानंतर जाधवर यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दरम्यान7/10/ 2023 रोजी आरोपींनी परत फिर्यादीची चर्चा करण्यासाठी मिरज पंढरपूर रोडवरील हॉटेल वाडीकर येथे बोलावून घेऊन उर्वरित पैशांची मागणी केली आणि एका साथीदारास फिर्यादीच्या घरी पैसे आणण्यासाठी पाठवलं होतं.
याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी एकाच वेळी हॉटेल वाडीकर आणि फिर्यादीच्या घरी छापा टाकून सर्वांना अटक केली. या कारवाईत आरोपींनी वापरलेल्या दोन चार चाकी गाड्या जप्त केल्यायत तर त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, मेघराज रुपनर, पोलीस नाईक ,सुशील मस्के, पोलीस नाईक रणजीत घारगे, पोलीस शिपाई अमोल शिरसागर, पोलीस शिपाई यासीन फकीर आदींनी केली आहे.