सांगली – ज्योती मोरे
सांगली तालुक्यातील कवठेपिरान येथे 26 मे 2023 रोजी मध्यरात्री दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या दरोडेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
26 मे रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणु शिफा मुजावर राहणार कवठेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या राहत्या भाड्याच्या घरात बाहेरील खोलीतील चौकटीत हात घालून कढी काढून सुमारे वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तोंडास रुमाल बांधलेल्या सहा दरोडेखोराने हातात दगड घेऊन घरात घुसून फिर्यादीच्या उजव्या डोळ्यावर दगड मारून जखमी करत आरडाओरडा करायचा नाही असं धमकावत घरातील कपाट आणि लोकर मधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना दिल्या होत्या त्यानुसार तपास अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या संयुक्त पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला सदर तपास सुरू असताना दरोडा हा काक्या सरपंच काळे राहणार चिकुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी घातला असल्याची खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार संशयीत का क्या सरपंच काळे हा वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथे येथे असल्याचे समजतात पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 307 नुसार अटक केली आहे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे खुनाचा प्रयत्न आष्टा पोलीस ठाण्याकडील खून तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कक्षेत कवठेपिरान येथील दरोड्याची कबुली दिल्याने त्या दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरचा दरोडा का क्या सरपंच काळे याने त्याचे साथीदार टारगेट उर्फ विशाल शिंदे राहणार वांगी जिल्हा सोलापूर, करण शेऱ्या भोसले राहणार माळेवाडी बारामती आणि करण भोसले याचे ओळखीचे तीन इसम यांनी केलेला असून गुन्ह्यात मिळालेल्या मुद्देमाला मधील आरोपी काका सरपंच काळे याचे वाटणीस आलेल्या मुद्देमाला पैकी साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने त्यामध्ये नेकलेस राणीहार मिनी गंठण अंगठ्या कानातील रिंगा मनी मंगळसूत्र लेडीज अंगठ्या सोन्याची चेन असा एकूण 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक तुषार पाटील, तपास अधिकारी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मगदूम, पोलीस हवालदार मेघराज रुपनर, संतोष माने, रमेश कोळी, सचिन मोरे, सुशील मस्के ,संजय कांबळे, सचिन धोत्रे, हनुमंत लोहार, आमसिद्ध खोत, कुबेर खोत, दीपक गायकवाड ,उदय माळी यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करत आहेत.