सांगली – ज्योती मोरे
सांगली प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदनगर ,मंगलमूर्ती कॉलनी, विद्यानगर, तुळजाई नगर, विकास कॉलनी इत्यादी भागात पावसाचे पाणी सुमारे 100 नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. हे पाणी काढण्यासाठी माजी नगरसेवक विष्णू माने यांनी स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, मुकादम प्रकाश चव्हाण व आरोग्य कर्मचाऱ्यांना घेऊन ठिकठिकाणचे चोकअप काढून,पाणी वाहते केले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र घाण पाणी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.माजी नगरसेवक विष्णू माने यांनी हा प्रश्न हाताळून या दुर्गंधीयुक्त पाण्याला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाट करून दिली.यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .