Tuesday, December 24, 2024
Homeखेळमहाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सांगली ला दोन सुवर्ण पदके प्राप्त...

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सांगली ला दोन सुवर्ण पदके प्राप्त…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेत औरंगाबाद येथे सुरू आहेत य स्पर्धेत इपी या प्रकारातील वैयक्तिक गटात सांगली फेंन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशनचा स्टार खेळाडू गिरीष वैभव जकाते याने सुवर्ण पदक पटकावले व सांगली जिल्हा संघाने इप्पी प्रकारात सांघिक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात औरंगाबाद वर ४५-४१ अश्या गुणांनी मात करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत विजेतेपद पटकावले या संघात गिरीष जकाते , मोरेश्वर पाटील , श्रेयस तांबवेकर , राम यादव आदी खेळाडूंचा समावेश होता यावेळी खेळाडूंना पदक प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे मार्गदर्शक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मा.अशोक दुधारे , कार्याध्यक्ष मा.प्रकाश काटोळे , राज्य सचिव डॉ उदय डोंगरे ,खजिनदार राजकुमार सोमवंशी , औरंगाबाद चे जिल्हा क्रिडाधिकारी मा.बाजीराव देसाई जिल्हा संघटनेचे सचिव व प्रशिक्षक डॉ शुभम जाधव व राज्य पंच, प्रशिक्षक अजित पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: