सांगली – ज्योती मोरे
ओळखीचा फायदा घेत मासूम इरफान जमादार राहणार विधाता कॉलनी विश्रामबाग सांगली यांच्या घराची डुप्लिकेट चावी बनवून घरात कोणी नसल्याचे पाहून सदर चावीचा वापर करून घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या सनी अशोक ढाले वय वर्षे 31,
सतीश हरिबा भोसले, वय 45, अतुल अंकुश कोळेकर वय वर्षे 27, आणि संदीप बिरू माने वय वर्षे 30 सर्वजण राहणार वानलेस वाडी तालुका मिरज या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी वानलेसवाडीतून अटक केली आहे.
त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा राणीहार, दीड लाखांचे प्रत्येकी दीड तोळे वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, 75 हजारांची एक दीड तोळ्याची चेन, 25 हजारांचे कानातील टॉप्स आणि 70 हजार रुपये रोख असा एकूण चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक पठाण,पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते,
पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलानी, पोलीस शिपाई आर्यन देशिंगकर,पोलीस शिपाई संकेत कानडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कोळेकर आदींनी केली आहे.