सांगली प्रतिनिधी–ज्योती मोरे
सांगलीतील पंचमुखी मारुती रोडवरील खणभाग महानगरपालिका हॉस्पिटल क्रमांक 4 या ठिकाणच्या तिवारी गल्लीत महावितरणच्या डीपीला आज रात्री अचानक आग लागली. याविषयी नागरिकांनी अग्निशमन दलास पाचारण करून सदर आग विझवली.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.