सांगली – ज्योती मोरे.
सांगली जिल्हयातील जत तालुका हा कायमचा दुष्काळी तालुका असून सदर तालुका हा आवर्षण प्रवण (प्रजन्य छायेतील) असल्याने मुळातच पाऊस कमी पडतो या वर्षी अवकाळी किंवा खरीपाचा कोणत्याही नक्षत्राचे पाऊस पडला नाही त्यामुळे जत तालुक्यात भीषण असा दुष्काळ पडलेला आहे.
त्यामुळे पिण्याचे पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा उपलब्ध नसल्याने जनावरे जगवण्यासाठी शेजारच्या राज्यातून पन्नास रुपये पेंडी या दराने चारा आणुन जनावरे जगवण्याचे काम शेतकरी करीत आहेत. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्याच्या शेतक-यांचे हाल होत आहेत.
त्याकरीता शासनाने जत तालुका हा त्वरीत दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करुन दुष्काळाच्या सर्व सोई उपलब्ध करुन दयावे या करीता माझ्या मतदार संघातील शेतकरी गेल्या दिड महिन्यापासून विविध प्रकारे आंदोलने करीत असून त्याकडे शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे मला आज विधान भवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
तरी शासनाने त्वरीत लक्ष घालून दुष्काळ जाहीर करावा.
तसेच जत तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्याकरीता गेल्या चाळीस वर्षापुर्वी मंजूर असलेली म्हैसाळ योजना दोन हजार कोटी मंजूर केले असून फेब्रुवारी अखेर पाणी उपलब्ध करुन देतो असे आश्वासन दिले होते. त्याची अदयापही कार्यवाही झाली नसून सदर दोन हजार कोटी पैकी रायजिंग मेनसाठी 900 (नवशे) कोटीचे टेंडर काढल्याचे समजते. उर्वरीत तालुक्यातील पाणी वितरकेचे अदयाप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.
त्यामुळे ही योजना रखडलेली जाणार आहे. त्यामुळे सदर योजना कार्यान्वीत होई पर्यंत कर्नाटक राज्याकडे महाराष्ट्र राज्याचे 7.850 टि.एस.सी. पाणी शिल्लक असून त्या पाण्यापैकी कोणताही खर्च न करता कर्नाटक राज्याची तुबची बबलेश्वर या योजनेतून माझ्या तालुक्यात पाणी मिळू शकते, तशी मागणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक राज्याकडे मागणी करुन माझ्या दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांना दयावे, तसेच दुष्काळी जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे थोडेफार पाणी आले आहे.
त्यासाठी विजेचा विद्युत प्रवार फार मोठया प्रमाणात कमी पडते दिवसातून फक्त चार तास विज मिळते तीही व्यवस्थीत मिळत नाही त्या करीता शासनाने आमच्या तालुक्यास मोठया मेगावॅट समतेची विदयुत उपकेंद्रे उपलब्ध करुन दयावेत.