ज्योती मोरे
सांगली – धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी प्रश्नी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने मा. बाळासाहेब दोडतल्ले यांचे नेतृत्वात मल्हारवीर मा. सुरेशदादा बंडगर, मा. आण्णासाहेब रुपनवर यांच्या आमरण उपोषन आंदोलनास सांगलीकरांचे वतीने जाहिर पाठिंबा.
हा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात माजी नगरसेवक विष्णु माने, निवांत कोळेकर, सागर माने, रामा बुकटे, संभाजी सरगर आदी बांधवांनी उपोषनकर्ते आणि त्यांचे सर्व सहकारी यांना पिवळा फेटा घालून पाठिंबा जाहीर केला.
चौंडी येथील आंदोलकांची विचारपुस करुन पुढील आंदोलनात्मक वाटचालीची माहिती घेतली तसेच सांगलीतील सांगली जिल्ह्याच्या नियोजनाच्या बैठकीचा वृत्तांत सांगून पुढील काळात सर्वांच्या निर्देशानुसार सांगलीतीस रस्त्यावरील आंदोलनाची दिशा ठरवून हा एस टी आरक्षणाचा कारवा जोपर्यंत एस टी प्रमाणपत्र नाही, तोपर्यंत तुम्हास मतदान नाही.
या मुद्द्यावर सांगलीतील प्रत्येक गावापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. गेली ७० वर्ष घटनादत्त आरक्षणापासून धनगर जमात शासन व्यवस्थेणे जाणिवपुर्वक वंचित ठेवले आहे. उत्तरप्रदेश, मद्यप्रदेश, झारखंड, ओरीसा राज्यात एससी-एसटी प्रवर्गात राज्याच्या यादीनुसार तिथे तिथे अंमलबजावणी झाली.
महाराष्ट्रातील धनगर जमातीवर र व ड च्या राजकीय कचाट्यात आडकवून जमातीस विकासापासून दूर ठेवल्याने मा. बाळासाहेब दोलतडे, मा. सुरेशदादा बंडगर, मा. आण्णासाहेब रुपनवर आणि यशवंतसेनेचे पदाधिकारी यांनी ६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
यावेळी १० दिवस झाले तरीही सत्ताधारी आणि विरोधक यांचेकडून कोणीही उपोषनस्थळी आले नसल्याचा उपस्थितांनी निषेध व्यक्त करुन महाराष्ट्रातील सर्व २८८ आमदार व खासदार यांना त्या त्या मतदारसंघातील धनगर जमातबांधवांनी पुढील तीन – चार दिवसात चौंडी आंदोलनाबाबत आपली भुमिका काय?
आपण आंदोलनस्थळी गेलात काय? उपोषणस्थळी जावून पाठिंबा पत्र देवून आपली भुमिका मांडणार काय? येत्या काळात सभागृहात धनगर आरक्षण प्रश्नी आपण भुमिका मांडणार काय? अशी विचारना करावी. अशा स्वरुपाची भुमिका मांडली.