सांगली प्रतिनिधी -ज्योती मोरे.
सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रलंबित असणाऱे प्रश्न मार्गी लावावेत तसेच महागाई गॅस दरवाढ तसेच शैक्षणिक अनुदान व पुनर्वसन संदर्भात असे विविध मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारीसाहेब, सांगली यांना देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पर्यंत भरपाई मिळाले नाही ती ताबडतोब मिळावी, नेहमीच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान अजून मिळालेले नाही ते तात्काळ मिळावे, शेतकऱ्यांचे बिलापोटी वीज त्यांचे कनेक्शन तोडू नये, शेतकऱ्यांना सकाळी सात ते सायंकाळी चार पर्यंत वीज पुरवठा करावा.
द्राक्ष डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, गोरगरिबांना उज्वल योजनेतून गॅस सिलेंडर दिलेले आहेत त्यांना मोफत गॅस भरून द्यावे, गॅस सिलेंडरचे दर 2014 मध्ये होते त्याचप्रमाणे मिळावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च राष्ट्रीय संशोधन आधी छात्रवृत्तीयांना फेलोशिप देण्यात यावी,आर्थिक विकास महामंडळांना त्वरित हमी देऊन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत ते वेळेत व्हावेत.
अपंग व विधवांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन वेळेत मिळावी, तसेच कलाकार मानधन पाच हजार करण्यात यावे, असे विविध मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना देण्यात आले. याच्या प्रती कृषी मंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सांगली, तसेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पोलीस अधीक्षक सांगली यांनाही पाठवण्यात आलेल्या आहेत.
निवेदन देताना सर्व काँग्रेस प्रेमी व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुभाष खोत, जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, इंटकचे डीपी बनसोडे, शिक्षक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष, ओबीसी चे जिल्हाध्यक्ष माननीय अशोक सिंग रजपूत, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे मनोज सरगर ,जिल्हा काँग्रेस युवक चे अध्यक्ष सुशील गोतपगार, आदिनाथजी मगदूम, अल्पसंख्यांक चे देशभूषण पाटील, सहकार सेलचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब पवार, महिला काँग्रेसच्या कांचन खंदारे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद जैनापुरे, सेवा दलाचे श्रीधर बारटक्के, झाकीर हुसेन मुजावर,मौलानी वंटमोरे, तसेच अल्पसंख्यांक चे मुनीर शिकलगार ,जमादार अत्तर पाशा पटेल ,नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, सुभाष पट्टणशेट्टी, प्रकाश माने, शमशाद बी नायकवडी ,जन्नत नायकवडी,सीमा कुलकर्णी,राजू पाटील, राजीव भोरे,बाबगोंडा पाटील, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, रवींद्र वळवडे, रवी पाटील, समडोळी अजित माने, आणि सचिन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.