Monday, November 18, 2024
Homeगुन्हेगारीऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यास सांगली सायबर पोलीस ठाण्यात यश...

ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यास सांगली सायबर पोलीस ठाण्यात यश…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील विजयनगर मध्ये राहणाऱ्या विनय रघुनाथ शिंदे यांच्या मोबाईलवर आठ एक 2023 रोजी बँक अकाउंट बंद होणार असल्याचा मेसेज आला सदर मेसेज बरोबर एक लिंक ही आली सदर लिंक उघडून त्यामध्ये माहिती भरल्याने फिर्यादीच्या अकाउंटमधील दोन लाख 87 हजार 891 रुपये काढल्याबाबत मेसेज आला त्यानंतर फिर्यादीने फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर लगेचच चांगली सायबर पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी आपली तक्रार नोंद केली.

या घटनेबाबत पोलिस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक आन्सर दलाल यांनी लागलीच सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांना तपासाबाबत सूचना दिल्या त्यानुसार उपनिरीक्षक रोहिदास पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे योगिता लोखंडे यांना तात्काळ तक्रारीची दखल घेऊन घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून फसवणूक झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत भारतीय स्टेट बँकेची संपर्क करून तक्रारदाराच्या अकाउंट मधील रकमेबाबत माहिती घेतली.

असता सदरची रक्कम फ्लिपकार्ट वरती खरेदी केल्याचे समजले त्यानंतर तात्काळ सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पथक यांनी फ्लिपकार्ट चे नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून ऑनलाईन फसवणूक झाल्याबाबत त्यांना कळवले त्या रकमेतून खरेदी केलेली वस्तू थांबवण्याबाबत त्यांना कळवण्यात आले. व सदरची रक्कम खातेदाराच्या अकाउंट मध्ये परत करण्याची विनंती केली त्यानुसार सदरच्या रकमेपैकी 2 लाख 62 हजार 891 रुपये परत मिळवण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश आले.

सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की आपल्या मोबाईल वरती अनोळखी मेसेज लिंक आलेस ती ओपन न करता आपली वैयक्तिक बँकेची माहिती त्यांना देऊ नये किंवा लिंक उघडू नये अशा प्रकारे फसवणुकीस बळी पडू नये तसेच अशा प्रकारे काही फसवणूक झाल्यास तात्काळ आपल्या बँकेची सर्व कागदपत्रे घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सायबर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: