सांगली – ज्योती मोरे.
क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या बाहण्याने लिंक पाठवून सदर लिंक ओपन करून क्रेडिट कार्डची माहिती भरायला भाग पाडत, श्रीमती स्वाती सतपाल नलवडे. राहणार-कुंडल, तालुका- पलूस. यांच्या खात्यातील 3 लाख 29 हजार 926 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती.
याबाबत नलवडे यांनी सांगली सायबर पोलीस ठाण्यास तक्रार दिल्यानुसार तांत्रिक तपासात सदरची रक्कम ही क्रोमा रिटेल या खरेदी प्लॅटफॉर्मवर गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, तात्काळ कारवाई करून सदर रकमेचे ट्रान्सँक्शन तात्काळ थांबून तक्रारदार श्रीमती.
नलावडे यांना सदर रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश आले. गेलेली रक्कम परत मिळाल्याने श्रीमती नलावडे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि सायबर पोलीस ठाण्यातील टीमचे आभार मानले.