सांगली – ज्योती मोरे.
ऑनलाइन टेलिग्राम ग्रुप वरून चॅटिंग करत ट्रेनिंग द्वारे ज्यादा परताव्याचं आमिष दाखवून वरून इस्लामपूर मधील हर्षवर्धन विश्वासराव पाटील यांची 21 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान घडली होती.
याबाबत हर्षवर्धन पाटील यांनं इस्लामपूर पोलिसात तक्रार दाखल केल्यानुसार इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण ,परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण,सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी कारवाई करत कॅपिटलिक्स टेलीग्राम ग्रुप वरील वीस फ्रॉड बँक अकाउंट आणि त्यामधील 7 कोटी 81 लाख रूपये रक्कम गोठवलीय.अशी माहिती आज पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिली आहे.