Monday, December 23, 2024
Homeराज्यबांधकाम कामगार नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी आरपीआयच्या सांगली शहराध्यक्षांचे जिल्हाधिकारी...

बांधकाम कामगार नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी आरपीआयच्या सांगली शहराध्यक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण…

सांगली – ज्योती मोरे

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बोगस कामगारांची नोंदणी, बोगस कामगारांना सही शिक्के देणाऱ्या इंजिनियरची चौकशी करण्यात यावी, नोंदणीकृत कामगारांना शासनाकडून दिले जाणारे साहित्य विविध राजकीय पक्षामार्फत का वाटप केले जाते? सदरचे साहित्य शासनाने वाटप न करता राष्ट्रीय पक्षाकडे कोणी आणि का दिले ?

याची सीआयडी सह अँटी करप्शन विभागाकडून चौकशी करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाचे सांगली शहराध्यक्ष सुनील साबळे यांच्यासह बापूसाहेब सोनवणे हे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

दरम्यान या विरोधात 14/3/ 2022 रोजीही उपोषण करण्यात आले होते. परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांनी लेखी पत्र दिल्याने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु तेव्हापासून आजतागायत कोणतीही चौकशी केली गेली नसल्याने आता ही चौकशी सीआयडी सह अँटी करप्शन विभागाकडून केली जावी अशी मागणी सुनील साबळे यांनी केली आहे. सदर प्रकाराची योग्य ती चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साबळे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: