Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसांगली | संजयनगर मधील युवकाचा निर्घृण खून...

सांगली | संजयनगर मधील युवकाचा निर्घृण खून…

सांगली – ज्योती मोरे

औद्योगिक वसाहत संजयनगर रोडवर शेजारी भाड्याच्या खोलत  नितीन आनंदराव शिंदे (वय अंदाजे 40 रा. चैतन्य नगर, दडगे प्लॉट, संजयनगर. सांगली) याचा निर्घृण खून करण्यात आला. संध्याकाळी सव्वा सहा वाजता सुमारास ही घटना घडली.

औद्योगिक वसाहत संजयनगर रोडवर शेजारी काही परप्रांतीय भाड्याच्या खोलीत राहत आहेत. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयत नितीन शिंदे हा परप्रांतीय युवकांच्या खोलत गेला. बंद खोलीमध्ये काहीतरी असं घडलं,की त्याच्या  डोकयात गॅस स्टोव्ह मारून ला. ग्यास स्टोव्हचा दणका कपळावर बसला आणि त्याचा जागीच मृत्या झाला.

मृतदेह रक्ताच्या पडलेला पाहून मारेकर्‍यांनी तिथून पलायन केले. माहिती मिळताच संजय नगर पोलीस ठाणे, एलसीबी चे पथक, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. संजयनगर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात हलवला.

पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले असून ह्या खुनात पाच ते सहा जणांचा सहभाग असल्याचा संशय प्रथमदर्शनी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयत नितीन शिंदे याला सांगली न्यायालयाने फोक्सो अंतर्गत शिक्षा ठोठावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयायाने त्यास जामिन दिल्याने तो बाहेर होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: