सांगली प्रतिनिधी–ज्योती मोरे.
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कॉम्बिंग ऑपरेशन द्वारे त्रिमूर्ती चौकी जवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बाबू काजप्पा मुंगळी वय वर्षे सत्तावीस राहणार शांतीनगर मजरेवाडी जिल्हा सोलापूर या अट्टल घरफोडयास ताब्यात घेतलंय. त्याचे अंगझडतीमध्ये स्क्रू ड्रायव्हर, कटावणी,एक्सा ब्लेड, हातोडा आदी साहित्य मिळून आले. त्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने विश्रामबाग, संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे कबूल केलंय.
सदर आरोपीवर सोलापूर मध्ये चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.त्याच्याकडून वीस हजार रुपये किंमतीची सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, वीस हजार रुपये किमतीची सहा ग्रॅमची सोन्याची चैन,दहा हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम, 16 हजारांचे चार ग्राम वजनाचे कानातील टॉप्स,24 हजारांचे दोन ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी तीन अंगठ्या, सात हजार पाचशे रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन पेले, दहा हजार रुपये किमतीचे 125ग्रॅम वजनाचे चांदीचे तुपाचे भांडे, तीन हजारांच्या 20 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वाट्या,वीस हजार रुपये किमतीचे १२० ग्रॅम वजनाचे चांदीची पैंजण, पाचशे रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे चांदीचे लिंग, पाचशे रुपये किमतीचे चांदीचे टॉप्स, एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल, दहा हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही, पाचशे रुपये किमतीचे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर,एक्साब्लेड,हातोडा असा एकूण ,2 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा कदम,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ माने,पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास मुंढे,पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गस्ते,पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलानी, महिला पोलीस कॉन्स्टेबल भावना यादव,सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.