Monday, December 23, 2024
Homeराज्यविज दरवाढी विरोधात सांगलीतील १५,००० हरकती विद्युत नियामक आयोगाकडे दाखल...

विज दरवाढी विरोधात सांगलीतील १५,००० हरकती विद्युत नियामक आयोगाकडे दाखल…

सांगली – ज्योती मोरे.

आज दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर हजारो प्रतीक राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या प्रचंड वीज दरवाढीला विरोध म्हणून हरकती दाखल करण्यात आल्या. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये तेराव्या मजल्यावर विद्युत नियमक आयोगाचे ऑफिस आहे.

या ठिकाणी सांगलीतले सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शिवसेना शहरप्रमुख मयूर घोडके, उपशहर प्रमुख राम काळे त्याचबरोबर कुपवाडचे सामाजिक कार्यकर्ते अलिभाई नालबंद, यांच्या नेतृत्वाखाली 15000 हरकती दाखल करण्यात आल्या.

सर्वपक्षीय कृती समिती आणि शिवसेना सांगली जिल्हा यांच्याकडून कृषी वीज ग्राहक घरगुती वीज ग्राहक कमर्शियल वीज ग्राहक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बरोबरच प्रतिनिधी संघटनांच्या माध्यमातून घरगुती वीज शेतकरी वीज ग्राहक यांच्या वैयक्तिक हरकती आज दाखल करण्यात आल्या. 37% ची प्रचंड वीज दरवाढ ही जनतेच्या माथी मारण्याचं काम वीज वितरण कंपनी व वीज नियामक आयोग कंपनीच्या माध्यमातून होत आहे.

त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे चुकीचे नियोजन चुकीच्या पद्धतीने वीज खरेदी व वितरणातली गळती आणि अन्य पर्याय पहायचे व करायचे उपाय करायचे सोडून चुकीच्या नियोजनामुळे होणारे वीज मंडळाचे वीज वितरण कंपनीचे व शासनाचे नुकसान भरून काढण्याऐवजी झालेले नुकसान सर्वसामान्य लोकांच्या माथी मारायचा उद्योग सातत्याने ईस्ट इंडिया कंपनी सारख्या या कंपन्यांच्या माध्यमातून सरकार व आयोग करत आहे.

अशा भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.सांगली जिल्ह्याबरोबरच राज्यातूनही हरकतीचा ओघ वाढत आहे, आणि आज या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी, संघटनांनी हरकती दाखल केल्या.महापौर दिग्विजय सूर्यवंशी,सर्व पक्षीय कृती समिती ,नागरिक जागृती मंच सांगली, जिल्हा शिवसेना, सांगली शहर जिल्हा काँग्रेस,सांगली जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना ,

सांगली चेंबर ऑफ कॉमर्स,व्यापारी एकता असोसिएशन सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन,मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ,नगरसेवक सर्वश्री उत्तम साखळकर, संजय मेंढे, प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर, रोहिणी पाटील,कांचन कांबळे, मंगेश चव्हाण, मनोज सरगर,युवराज गायकवाड,स्वाती सुरेश पारधी,

सांगली जिल्हा परिषद कामगार सभा, सांगली जिल्हा इमारत व दळण वळण मजदुर सभा,सांगली जिल्हा जनरल कामगार सभा,सांगली जिल्हा हमाल पचायात,कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत जिल्हा सांगली,अंग मेहनती कष्टकरी समिती आदी संस्था,संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: