नांदखेड गावचे सुपुत्र श्री लक्ष्मण यशवंतराव गावंडे यांनी भारतीय सेनेमध्ये गौरवास्पद काम करून एक आदर्शाचा वस्तुपाठ घडविला. या बद्दल श्री लक्ष्मणभाऊ यांचे मनस्वी अभिनंदन. लक्ष्मणभाऊ यांनी आपले शालेय शिक्षण आपल्या गावातून पूर्ण करून, १९९५ च्या दशकात भारतीयसेनेमध्ये प्रचंड मेहनत करून प्रवेश मिळविला.
शिपाई पदापासून ते जुनिअर कमिशन अधिकारी (राष्ट्रपतीपद रँक अधिकारी) या पदापर्यंत त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली आणि वयाच्या ५० वर्षातही लक्ष्मणभाऊ आपल्या देशासाठी अखंडपणे सेवा देत आहेत. नांदखेडमधून ते प्रथम नागरिक आहेत.ज्यांनी भारतीय सैन्यामध्ये जाण्याचा मान मिळविला.
त्यांची प्रेरणा घेऊन आमच्या नांदखेड गावातून ५ तरुण भारतीयं सैन्यात दाखल झालेत. आणि सेवा देत आहेत.
लक्ष्मणभाऊ यांनी अतिशय प्रतिकूल परिस्तिथीतून संघर्षमय प्रवास केला आणि अविरतपणे करत आहेत. त्यांच्या संवादातून या यशाचे श्रेय आपल्या वैखुंठवासी आई वडील,जेष्ठ वडीलबंधू श्री गोकुळभाऊ,कुटुंबीय ,गावकरी आणि देशवासी यांना देतात.
माझ्या लहानपणी गावात असतांना.शेती आणि मातीशी प्रत्यक्ष संबंध होता.श्री लक्ष्मणभाऊ यांचे दिवंगत आदरणीय आई वडील वै.ह.भ.प यशवंतआबा आणि वै.जनाईआजी यांचे कष्टाळू जीवन मी पाहले, त्यांच्या कष्टाची फळं आज लक्ष्मणभाऊ यांच्या देशसेवेतून सर्वांना दिसत आहेत.हे समस्त नांदखेडवासीयांसाठी अभिमानस्पद आहे.
भारतीय सेनेमध्ये काम करत असतांना गाव ,कुटुंबीय ,मित्र ,नातेवाईक या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो.
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असतांना.जायगाव (आसाम सीमेलगत ) भुतान येथे झालेल्या परेडमध्ये त्यांची विशेष अतिथी आणि परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.हा त्यांच्या कार्याचा सन्मान नक्कीच येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहणार.
श्री लक्ष्मणभाऊ यांच्या देशसेवेला सलाम!
जय जवान जय किसान!!
संवेदनशील धन्यवाद,
शेतकरीपुत्र,
प्रदीप बाबाराव म्हैसने
नांदखेडकर ह. मु. मुंबई
मोबा. ९९२०८६९७१५