Sunday, December 22, 2024
Homeराजकीयघबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगीता घबक यांचा मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या...

घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगीता घबक यांचा मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सत्कार…

सांगली – ज्योती मोरे.

घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी बहूमतांनी विजयी झाल्याबद्दल परिवर्तन पॅनेल च्या संगिता माणिकराव घबक यांचा तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल सौ. वंदना दिपकराव खोत यांचा महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व समाज कल्याण खात्याचे मंत्री, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे माजी अध्यक्ष, राज्याचे जेष्ठ नेते मा. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या शुभहस्ते शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते, सांगली अर्बन को ऑफ बँक लि. सांगली शाखा इस्लामपूर चे शाखा सल्लागार श्री. बजरंग कदम, शंकरराव कदम, दिपकराव खोत, सुनिल भारती, सयाजी खोत, बाबासो भारती, कृष्णात खोत, अमित घबक, अजित कदम, हंबिरराव कदम, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, आनंदराव कदम, प्रताप कदम, प्रकाश कदम, सौ. आशाराणी कदम, सौ. राणी गणेश घबक, जालिंदर कदम, रविंद्र कदम, प्रशांत कदम यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: